Ahmedabad Air India Plane Crash Saam
मुंबई/पुणे

Air india Blackbox : अहमदाबाद विमान दुर्घटनेतील ब्लॅक बॉक्स भारतातच, पुण्यात केंद्रीय मंत्र्यांनी दिली माहिती

Ahmedabad Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातातील ब्लॅक बॉक्स भारतातच असून तपासणी सुरू असल्याची माहिती केंद्रीय मंत्री राम मोहन नायडू यांनी पुण्यात दिली. चार धाम मधील हेलिकॉप्टर अपघात रोखण्याचे उपायही जाहीर

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अक्षय बडवे, पुणे प्रतिनिधी

Ahmedabad Air India Plane Crash : अहमदाबाद मध्ये झालेल्या विमान दुर्घटनेच्या बाबत मोठी माहिती आता समोर आली आहे. एअर इंडिया विमानाचा "ब्लॅक बॉक्स" भारतातच असून अहमदाबाद दुर्घटनेतील "ब्लॅक बॉक्स" तपासणीसाठी भारताबाहेर पाठवलेला नाही एअरक्राफ्ट एक्सीडेंट इन्वेस्टीगेशन ब्युरो यांच्याकडून ब्लॅक बॉक्स ची तपासणी सुरू असल्याची माहिती केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांनी दिली.

केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांनी आज पुण्यात आयोजित केलेल्या हेलिकॉप्टर आणि स्मॉल एअरक्राफ्ट समिट या कार्यक्रमाला उपस्थिती लावली. त्यांच्यासोबत नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ सुद्धा उपस्थित होते.

माध्यमांशी वार्तालाप करताना त्यांना अहमदाबाद येथील विमान दुर्घटनेच्या बाबत विमानातील ब्लॅक बॉक्स परदेशात पाठवला आहे का असा प्रश्न विचारला गेला. यावेळी त्यांनी "ब्लॅक बॉक्स" भारतातच असून एअरक्राफ्ट एक्सीडेंट इन्वेस्टीगेशन ब्युरो यांच्याकडून ब्लॅक बॉक्स ची तपासणी सुरू आहे आणि आम्ही तो बाहेर पाठवणार नाहीत ती फक्त माध्यमात चर्चा आहे, वस्तुस्थिती तशी नाही असं नायडू म्हणाले.

चार धाम मधील हेलिकॉप्टर अपघात रोखण्यासाठी उपाययोजना

नायडू यांनी चार धाम मधील होणाऱ्या हेलिकॉप्टर दुर्घटनेच्या बाबत सुद्धा भाष्य केलं. केदारनाथ, बद्रीनाथ येथील अपघातांवर नायडू म्हणाले, "हेलिकॉप्टर च्या होत असलेल्या अपघाताबाबत जनतेच्या सुरक्षेला सर्वोच्च महत्त्व दिलं आहे त्यात कुठली ही तडजोड केली जाणार नाही. सुरक्षितता अधिक मजबूत करणे तसेच निरीक्षण वाढवणे यावर भर दिला जात आहे. डोंगराळ भागात लवकरच एयर ट्रॅफिक कंट्रोल मॅनेजमेंट केला जाईल. अनेक वेळा अशा भागांमध्ये हवामान अचानक बदलले जाते ज्यामुळे अपघात घडतात. त्यासाठी हवामान डेटा ऑब्सरवेशन केलं जाईल. येत्या सप्टेंबर पर्यंत प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून येत्या २ ते ३ महिन्यात ती सेवा सुधारल्या जातील. काही दिवसांपूर्वी केदारनाथ आणि बद्रीनाथमध्ये हेलिकॉप्टर चे अपघात झाले ज्यामध्ये अनेकांचा मृत्यू झाला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राज ठाकरेंच्या भाषणानंतर अमराठींची प्रतिक्रिया समोर, नेमकं काय म्हणाले? पाहा,VIDEO

Horrific Accident : थरारक! भरधाव कारने २० हून अधिक जणांना चिरडलं, ५ जणांची प्रकृती चिंताजनक

Maharashtra Live News Update: मालेगाव जन्म दाखला घोटाळा प्रकरण,नायब तहसीलदार व त्यांच्या पत्नीच्या अडचणीत वाढ

Panic Attack: पॅनिक अटॅक का येतो? महत्त्वाची कारणे कोणती?

Jasprit Bumrah : जसप्रीत बुमराहचे कसोटी क्रिकेट खेळणे, भारतासाठी फायद्याचे की तोट्याचे? पाहा धक्कादायक आकडे

SCROLL FOR NEXT