Pune News: प्री-वेडिंग फोटोशूटवर बंदी घालण्याचा निर्णय विविध समाजाकडून घेतला जात आहे. लग्नाच्या मुहूर्ताआधी उत्साह आणि आनंदात केल्या जाणाऱ्या या प्री-वेडिंग फोटोशूटला अनेक समाजातून विरोध वाढत आहेत. प्री-वेडिंग फोटोशूटवर बंदी घालता येऊ शकते का, याबद्दल वकील असीम सरोदे यांनी महत्वाची माहिती दिली आहे. (Latest Marathi News)
सध्या लग्नाच्या मुहूर्ताआधी प्री-वेडिंग फोटोशूट करण्याचा ट्रेंड आहे. अनेक तरुण-तरुणी आता प्री-वेडिंग फोटोशूट करण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी जात असतात. प्री-वेडिंग फोटोग्राफी करताना पाश्चिमात्य पद्धतीचे कपडे भावी वर-वधू घालतात. त्यासोबत या फोटोशूटचे प्रदर्शन लग्न समारंभात मोठ्या डिजिटल पडद्यावर करत असतात. प्री-वेडिंग फोटोशूटची क्रेझ आता शहरासहित ग्रामीण भागातही होत आहे.
लग्नाच्या निमित्ताने पाश्चिमात्य देशातील अनिष्ट प्रथांचे अंधानुकरण केले जात असल्याचे अनेक समाजातून म्हटलं जात आहे. यामुळे देशातील विविध समाजाने प्री-वेडिंग फोटोशूटवर बंदी घालण्याच्या निर्णय घेतला आहे.
अशा प्री-वेडिंग फोटोशूटर बंद घातली जाऊ शकते का, यावर वकिलांनी माहिती दिली आहे. यावर वकील असीम सरोदे म्हणाले, ' प्री- वेडिंग फोटोशूटवर बंदी घालता येणार नाही. अशी बंदी कायद्याला धरून नाही. तर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन उपयोग नाही. प्री-वेडिंग फोटोशूट हा व्यक्ती स्वातंत्र्याचा भाग आहे'.
प्री-वेडिंग फोटोशूट हे लग्नाआधी केलं जातं. अनेक भावी वर-वधू हे फोटोशूट करत असतात. सध्या तरुणाईमध्ये या प्री-वेडिंग फोटोशूटचं क्रेझ आहे. स्टायलिश, आरामदायी आणि ट्रेंडी लूकमध्ये भावी वर-वधूकडून हे फोटोशूट केले जाते.
अनेक जण निसर्गाच्या सानिधान्यात हे फोटोशूट करत असतात. लग्नाआधीच्या आठवणी वर-वधू कॅमेरात कैद करत असतात. कपल्स या फोटोशूटसाठी हजारो रुपये खर्च करायला तयार असतात.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.