अकोला : अकोला (Akola) जिल्ह्यातील भोकर गावात विद्युत रोहित्रावर काम करीत असताना युवकाचा शॉक लागून मृत्यू (Death) झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. या घटनेने भोकर गावात खळबळ उडाली आहे. विठ्ठल गजानन परनाटे असे मृत व्यक्तीचे नाव आहे. या घटनेमुळे भोकर गावावर शोककळा पसरली आहे. ( Akola Latest News In Marathi )
हे देखील पाहा -
मिळालेल्या माहितीनुसार, भोकर गावात विठ्ठल परनाटे हा २७ वर्षीय युवक अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील भोकर गावात रोजगार म्हणून इलेक्ट्रीशियनचे काम करायचा. हा युवक भोकर गावांमध्ये नव्हे तर परिसरामध्ये कोणाच्याही हाकेला ओ देऊन त्यांचे काम करायचा. त्यात आज गावात पिण्याचा पाण्याचा प्रश्न उपस्थित झाला होता. त्यामुळं विठ्ठल गावाला पाणी मिळावे यासाठी रोहित्रावर चढून झालेला बिघाड दुरुस्त करण्याचा प्रयत्न करीत होता. मात्र या रोहित्राला होणार वीज पुरवठा बंद करण्यात आला नव्हता. त्याला याची माहिती न दिल्याने विठ्ठलला जीव गमवावा लागला आहे. विठ्ठलच्या मृत्यूनंतर गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान, सदर युवक हा कोणाच्या म्हणण्यावरून रोहित्रावर काम करण्यास गेला होता असा प्रश्न उपस्थित होत आहे. सदर काम हे महावितरणच्या अधिकारी कर्मचाऱ्यांचे असून अनेक ठिकाणी खासगी व्यक्तींकडून कामे केली जातात. वरिष्ठ अधिकारी हे वीज बिलाची वसुलीची सक्ती कर्मचाऱ्यांवर लादत असल्याने त्यांना लोकवस्तीत जाऊन काम करणे शक्य होत नाही. त्यामुळे खासगी मजुरांकडून काम करून घेतल्याचे धक्कादायक माहिती समोर येत आहे.
याआधीही पाथर्डी येथील युवकाचाही अशाच प्रकारे मृत्यू झाला होता. त्यामुळे विद्युत वितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या गंभीर प्रकाराकडे लक्ष घालण्याची आवश्यकता आहे. मजुराकडून काम करून घेत असताना कुठल्याही प्रकारची दक्षता घेतल्या जात नसल्याचे निदर्शनास येत आहेत. या प्रकारांना जबाबदार कोण असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
Edited By - Vishal Gangurde
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.