सातारा : शिवसेना कार्यकर्ते संताेष परब (santosh parab) हल्ला प्रकरणात खूनाच्या गुन्ह्यात हवे असलेले भाजप आमदार नितेश राणे (nitesh rane) हे शुक्रवारी सिंधूदूर्ग जिल्हा व सत्र न्यायालयात (sindhudurg court) हजर झाले हाेते तर मग त्यांना कस्टडीत का घेतलं नाही हा प्रश्न सरकारी वकील प्रदीप घरत यांना पडला हाेता. याबाबत घरत यांनी आजच्या सुनावणीपुर्वी माध्यमांशी बाेलताना नमूद केले. दरम्यान आमचे म्हणणे आज आम्ही मांडत आहाेत. आम्ही न्यायालयाच्या कामकाजानंतर तुम्हांला सविस्तर माहिती देऊच असे घरत यांनी स्पष्ट केले. (nitesh rane bail hearing latest news updates)
आज दुपारी नितेश राणे (nitesh rane) यांनी दाखल केलेल्या नियमीत जामीन (bail) अर्जावर सुनावणी हाेईल. आजच्या सुनावणीकडे पाेलिस दलाचे देखील लक्ष लागून राहिले आहे. सिंधूदुर्ग (sindhudurg) जिल्ह्यात पाेलिसांची कडेकाेट पाेलिस बंदाेबस्त आहे. दरम्यान आज सकाळच्या सुमारास आमदार नितेश राणे (nitesh rane latest marathi news) यांचे स्वीय सहाय्य्क राकेश परब (rakesh parab) कणकवली (kankavali) पोलिसांत हजर झाले आहेत.
राणेंनी शिवसेना कार्यकर्ते संताेष परब (santosh parab) हल्लाप्रकरणात सर्वाेच्च न्यायालयाच्या निर्देशानूसार नियमीत जामीनासाठी शुक्रवारी अर्ज दाखल हाेता. त्यावर आज सुनावणी हाेत आहे. आज नितेश राणेंना दिलासा मिळणार की त्यांचा जामीन अर्ज फेटाळला जाणार याकडे सा-या राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.
edited by : siddharth latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.