- अजय साेनवणे
Malegoan News : नाशिक (nashik) जिल्ह्यातील मालेगाव (malegoan) तालूक्यातील गुगुळवाड येथे स्मशानभूमीचा स्लॅब बांधकाम सुरु असताना कोसळल्याची घटना घडली. यात तेथे काम करणारे मजूर थोडक्यात बचावल्याने मोठी दुर्घटना टळली. या घटनेत सुमारे १४ ते १५ मजूर किरकाेळ जखमी झाले आहेत. (Maharashtra News)
गुगुळवाड येथे पंचवीस वर्षापुर्वी पत्र्यच्या स्मशानभूमीचे काम करण्यात आले होते. दोन वर्षांपुर्वी जीर्ण झाल्याने ते पडून गेल्याने दोन वर्षापासून उघड्या चौथ-यावरच मृतदेहाचे अंत्यसंस्कार करावे लागत होते.
मागील वर्षी जनसुविधा निधी मधून स्मानभूमीसाठी सात लाख रुपयांचा निधी मंजूर झालेला होता. या निधीतून चार महिन्यांपासून काम सुरु होते. शेवटचा स्लॅब टाकायचे काम सुरु असताना अचानक स्लॅब कोसळला.
ज्यावेळेस स्लॅब कोसळला त्यावेळेस तेथे १४ ते १५ मजूर काम करीत होते. स्लॅबचा एक खांब खचल्याचा लक्षात येताच मजूरांनी त्यावरुन उड्या मारल्या. यात मजूरांना किरकोळ स्वरुपाच्या जखमा झाल्या. हा प्रकार घडल्यानंतर ग्रामस्थांनी घटनास्थळी गर्दी केली होती. हे काम निकृष्ट दर्जाचे व त्यात भ्रष्ट्राचार झाल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.