Silver Rate Hike Saam Tv
महाराष्ट्र

Silver Rate Hike: सोन्यानंतर चांदीला चकाकी; किलोमागे १ लाख १३ हजार रुपये मोजावे लागणार

Silver Rate Hike Today: सोन्यानंतर आता चांदीच्या दरात वाढ झाली आहे. एक किलो चांदी आता १ लाख १३ हजार रुपयांवर विकली जात आहे. आता खरेदीदारांना सोने-चांदी खरेदी करायचे की नाही असा प्रश्न पडला आहे.

Siddhi Hande

गेल्या अनेक दिवसांपासून सोन्याचे भाव वाढत आहेत. आता तर सोन्याचे दर प्रति तोळा १ लाखांच्या वर गेले आहेत. सोन्यानंतर आता चांदीचे दर वाढले आहेत. त्यामुळे खरेदीदारांना आता सोने-चांदी खरेदी करावं की नाही असा प्रश्न पडला आहे. चांदीच्या दराने तर आता उच्चांकी गाठली आहे. चांदी १ लाख १३ हजार रुपयांवर विकली जात आहे. (Silver Rate Hike)

सुवर्णनगरीत म्हणजेच जळगावमध्ये चांदीच्या भावाने उच्चांक गाठला आहे. जळगाव चांदीच्या भावात १५०० रुपयांची वाढ झाली. त्यामुळे चांदी एक लाख १० हजार रुपये अशा नव्या उच्चांकी भावावर पोहोचली.

सोन्याच्या भावातही २०० रुपयांची वाढ होऊन ते ९९ हजार ५०० रुपयांवर पोहोचले. १४ ते १६ जून या तीन दिवसांत एक लाख सात हजार ५०० रुपयांवर स्थिर असलेल्या चांदीच्या भावात मंगळवारी एक हजार रुपयांची वाढ झाली. त्यामुळे चांदीचे भाव एक लाख आठ हजार ५०० रुपयांवर पोहोचले.

चांदीचे भाव पाहिले तर दोन आठवड्यांत त्यात १२ हजार रुपयांची वाढ झाली आहे. २ जून रोजी चांदी ९८ हजार रुपयांवर होती. त्यानंतर त्यात वाढ होत जाऊन ती १८ जूनपर्यंत एक लाख १० हजार रुपये प्रति किलोवर पोहोचली.आणि आणखी एक हजार ५०० रुपयांची वाढ होऊन चांदी एक लाख १० हजार रुपये प्रति किलोवर पोहोचली. चांदीचा हा नवा विक्रमी भाव आहे. एक किलो चांदीसाठी आता जीएसटीसह एक लाख १३ हजार ३०० रुपये मोजावे लागणार आहेत.

दुसरीकडे, मंगळवारी ९९ हजार ३०० रुपयांवर असलेल्या सोन्याच्या भावात बुधवारी सकाळी १०० रुपयांची घसरण होऊन ९९ हजार २०० रुपयांवर आला. दुपारी त्यात ३०० रुपयांची वाढ होऊन ते ९९ हजार ५०० रुपये प्रति तोळ्यावर पोहोचले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Politics: 'होय.. मुंबईतील डान्स बार माझ्याच पत्नीच्या नावावर' परबांच्या आरोपानंतर रामदास कदमांची कबुली

10 rupees snacks : मद्यप्रेमींना आवडतो १० रुपयांचा 'हा' चकणा; वर्षभरात जवळपास १०००० कोटींचा व्यवसाय

Train Viral Video: पावसाळा आहे भौ, चड्डी-बनियन सुकणार कशी? मग काय भावानं नादच केला, ट्रेनमध्येच सुकत ठेवले कपडे; Video

Maharashtra Live News Update: नागपुरात चोरट्याकडून तब्बल २७ दुचाकी जप्त

धाराशिवमध्ये मराठा कार्यकर्त्यांचा मंत्री प्रताप सरनाईकांना घेराव; नेमकं काय घडलं? VIDEO

SCROLL FOR NEXT