Sakoli Vidhansabha Constituency Saam Tv
महाराष्ट्र

Saam Exit Poll: साकोलीमध्ये नाना पटोले होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Sakoli Vidhansabha Constituency, maharashtra Exit Poll : साकोली मतदारसंघामध्ये नाना पटोले आणि अविनाश ब्राम्हणकर यांच्यात प्रमुख लढत झाली. या दोघांपैकी कोण विजयी होणार याबाबत महत्वाची माहिती समोर आली आहे.

Priya More

भंडारा जिल्ह्यातील साकोली विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेससाठी खूपच महत्वाचा मतदारसंघ मानला जातो. साकोली विधानसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला लागली आहे यामागचे कारण म्हणजे या मतदारसंघामध्ये काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी निवडणूक लढवली आहे.

नाना पटोले यांच्या विरोधात महायुतीने भाजपचे अविनाश ब्राम्हणकर यांना उमेदवारी दिली. या मतदारसंघामध्ये नाना पटोले आणि अविनाश ब्राम्हणकर यांच्यात प्रमुख लढत झाली. या दोघांपैकी कोण विजयी होणार याबाबत महत्वाची माहिती समोर आली आहे.

सकाळच्या एक्झिट पोलनुसार, साकोली मतदारसंघामध्ये नाना पटोले हे संभाव्य आमदार होण्याची शक्यता आहे. नाना पटोले भाजपच्या अविनाश ब्राम्हणकर यांचा पराभव करण्याची शक्यता आहे. या मतदारसंघामध्ये काँग्रेसला पुन्हा गड राखण्यात यश येण्याची शक्यता आहे. साकोली मतदारसंघातील नागरिकांनी पुन्हा नाना पटोले यांना पसंती दिली आहे.

नाना पटोले गेल्या २५ वर्षांपासून साकोली विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व करत आहेत. पण त्यांनी काहीच चांगली कामं न केल्यामुळे नागरिक नाराज होते. असे असतानाच या मतदारसंघामध्ये भाजपच्या मतांचे विभाजन झाल्यामुळे याचा फायदा नाना पटोले यांना होणार आहे. त्यामुळे या मतदारसंघामध्ये काँग्रेसचा विजय होऊन भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांचा १ लाखांपेक्षा जास्त मतांनी पराभव

VIDEO : विधानसभेतील विजयाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भावुक | Marathi News

Maharashtra Election Result: पराभव दिसताच संजय राऊतांनी फोडलं EVM वर खापर.. भन्नाट मिम्स तुफान व्हायरल

Maval Vidhan Sabha : मावळमध्ये सुनील शेळके विक्रमी मतांनी विजयी; सर्वपक्षीय नेत्यांचा पॅटर्न ठरला अयशस्वी

Devendra Fadnavis : मुख्यमंत्रिपदाबाबत देवेंद्र फडणवीस यांचं मोठं वक्तव्य

SCROLL FOR NEXT