मराठा समाज आरक्षण प्रश्नी शरद पवार उदासीन; नरेंद्र पाटलांचा सवाल भारत नागणे
महाराष्ट्र

मराठा समाज आरक्षण प्रश्नी शरद पवार उदासीन का; नरेंद्र पाटलांचा सवाल

शरद पवार हे हॉटेल वाल्यांचे प्रश्न सोडू शकतात पण मराठा समाजाच्या आरक्षण प्रश्नावर इतके उदासीन का ? असा सवाल नरेंद्र पाटील यांनी केला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

भारत नागणे

पंढरपूर - ४ जुलैच्या मराठा संघर्ष मोर्चाच्या बैठकीची आज पासून संत नामदेव महाराज पायरी जवळून सुरुवात झाली. यावेळी माजी आमदार नरेंद्र पाटील Narendra Patil यांनी शरद पवार Sharad Pawar यांच्यावर जोरदार टीका केली आहे. शरद पवार हे हॉटेल Hotel वाल्यांचे प्रश्न सोडू शकतात पण मराठा समाजाच्या आरक्षण प्रश्नावर इतके उदासीन का ? असा सवाल नरेंद्र पाटील यांनी केला आहे. Narendra Patil's allegations on Sharad Pawar

राष्ट्रवादी काँग्रेस हा मराठा आमदारांचा पक्ष म्हणून ओळखला जातो. मागील वेळी सर्व समाजाने एकत्रित ‌ येऊन आंदोलन केले. पण या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसने सोयीस्कर पणे आंदोलनास बगल दिली आहे असा आरोप करत या आंदोलनास राजकीय वास येतो की काय अशी शंका‌ आता उपस्थित केली जात आहे. समाजाला एकत्र करून आमची ही सरकार विरोधातील आरक्षणाची लढाई सुरूच ठेवणार आहे असे देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

राष्ट्रवादी काँग्रेसची ओळख मराठ्यांचा पक्ष म्हणून आहे. सर्वाधिक आमदार खासदार हे मराठा समाजाचे आहेत. मराठ्यांचा वापर फक्त मतदाना करता करायचा का की, त्यांच्या मुलांना यूपीएससी एमपीएससी करून शिकवायचे आहे हे आता त्यांनी ठरवावे असा प्रश्न देखील नरेंद्र पाटील यांनी या वेळी उपस्थित केला आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Priyanka Gandhi : वायनाड पोटनिवडणुकीत प्रियंका गांधींचा दणदणीत विजय; मोकेरी यांना 4 लाखांच्या फरकाने हरवलं

Uddhav Thackeray : लाटेपेक्षा त्सुनामी आली; महायुतीच्या विजयावर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: महिला असुरक्षित,बेकारी वाढतेय- उद्धव ठाकरे

Mental Health: मानसिक आरोग्य संतुलित ठेवण्यासाठी 'या' गोष्टींचा करा आहारात समावेश

Health: शरीरासाठी आवश्यक पदार्थ कोणकोणते? जाणून घ्या एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT