Maharashtra Bendur 2023 Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Bendur 2023: 'आम्ही साहेबांसोबत...'; बेंदूर सणाचे औचित्य साधून शेतकऱ्याने बैलावर रेखाटले शरद पवारांचे चित्र

Maharashtra Bendur 2023: या राजकीय भूकंपानंतर ग्रामीण भागातील शेतकरी देखील त्यांच्या भूमिका स्पष्ट करत शरद पवारांना पाठिंबा देताना दिसत आहे.

विजय पाटील

Sangli News: राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांसहित त्यांच्या समर्थक आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकरला पाठिंबा दिल्याने राजकीय घडामोडींना वेग आला आहे .अजित पवारांच्या भूमिकेमुळे राष्ट्रवादीत शरद पवार आणि अजित पवार असे दोन गट पडले आहेत. अजित पवारांच्या भूमिकेमुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम पाहायला मिळत आहे. या राजकीय भूकंपानंतर ग्रामीण भागातील काही शेतकरी त्यांच्या भूमिका स्पष्ट करत शरद पवारांना पाठिंबा देताना दिसत आहे. (Latest Marathi News)

महाराष्ट्रामध्ये राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली आहे. राज्यात कोणी अजित पवार गटात तर कोणी शरद पवार यांच्या गटात आहे. असे कार्यकर्ते आणि नेते सांगत आहेत.

सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील तांबवे गावचे बैलप्रेमी यांनी बेंदूर सणाचे औचित्य साधून बैलावर रंगरंगोटीद्वारे 'आम्ही साहेबांसोबत आहोत', असे लिहिले आहे. या मजकुराची आणि बैलाची चर्चा तालुक्यात रंगली आहे.

वाळवा तालुक्यातील आनंदराव गावडे यांनी काल बेंदुर सणाच्या निमित्ताने त्याच्या कॅप्टन आणि पल्सर या बैलांवर 'आम्ही साहेबांच्या सोबत' असे लिहिले आहे. एका बाजूला विठ्ठल आणि दुसऱ्या शरद पवारांची छबी का आम्ही साहेबाच्या सोबत असे लिहिले आहे.

शेतकऱ्यांच्या अनोखी कलाकृतीची राज्यभर चर्चा सुरू झाली आहे. काल शरद पवार यांनी साताऱ्यात उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचं दर्शन घेतल्यावर शक्तिप्रदर्शन केलं. यानंतर काही उपस्थितांना संबोधित देखील केले.

अजित पवारांच्या बंडामुळे राष्ट्रवादीसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. त्यामुळे राज्यातील सर्वसामान्य कार्यकर्त्यांपुढे कोणत्या गटाला पाठिंबा द्यावा, असा प्रश्न उभा ठाकला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: आष्टीत श्वानांच्या अन्नात विष कालवले, विषबाधेने १६ श्वान ठार

Girish Mahajan : ठाकरे ब्रँड त्याच दिवशी संपला; मंत्री गिरीश महाजन यांचा ठाकरेंवर हल्लाबोल

Shocking: गुप्तांगात मिरची पावडर टाकली, उलटं लटकून मारहाण; पोलिसांचे 4 तरुणांसोबत भयंकर कृत्य

Air Plane Crash: उड्डाणानंतर काही क्षणातच विमानाच्या इंजिनला आग; पाहा थरारक VIDEO

Pune Ganeshotsav Special Trains : पुण्याहून कोकणात जाणाऱ्या गणेशोत्सव स्पेशल गाड्या; कुठे थांबणार? तारीख, वेळ जाणून घ्या...

SCROLL FOR NEXT