Jalgaon Railway Saam tv
महाराष्ट्र

रेल्वेतून २ हजार ९३६ जणांचा फुकट प्रवास; अठरा लाखांचा दंड वसूल

रेल्वेतून २ हजार ९३६ जणांचा फुकट प्रवास; अठरा लाखांचा दंड वसूल

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : रेल्वे प्रशासनातर्फे राबविण्यात आलेल्या ‘मेगा’ तिकीट तपासणी मोहिमेत तब्बल २९३६ प्रवाशांना पकडून त्यांच्याकडून १७ लाख ८३ हजार ७८६ रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. सकाळपासून सुरू (Jalgaon) केलेली तिकीट तपासणी मोहीम रात्री उशिरापर्यंत सुरू होती. (Jalgaon Railway Ticket Checking)

तिकीट तपासणी करताना १५६ कर्मचारी, ६३ व्यावसायिक पर्यवेक्षक, ४८ आरपीएफ कर्मचारी यांनी भुसावळ, नाशिक, मनमाड, खंडवा, अकोला (Akola), बडनेरा या ६ स्थानकांवर तिकीट तपासणी करण्यात केली. मोबाईल टीमद्वारे ७० रेल्वेगाड्याही तपासण्यात आल्या. (Railway) रेल्वेमध्ये अगोदर तिकीटांच्या खिडकीवर गर्दी असायची. यामुळे गाडी सुटेल म्हणून काही प्रवासी तिकीट न काढता प्रवास करीत होते. तर इतर विविध कारणांद्वारे तिकीट घेत नव्हते. मात्र आता रेल्वे तिकीट देण्याबाबत स्मार्ट झाली आहे.

स्‍मार्ट सुविधा तरीही विना तिकिट

आता प्रवाशांच्या मोबाईलमध्ये तिकीट काढण्याची सुविधाही यूटीएस ॲपद्वारे केली आहे. यामुळे प्रवाशांना जर तिकीट खिडकीवर प्रचंड गर्दी असेल, तर या ॲपद्वारेही तिकीट काढता येते. असे असताना अनेक प्रवासी तिकीट न काढता प्रवास करतात. याला आळा बसावा यासाठी रेल्वेतर्फे दर आठवड्यात अचानक तिकीट तपासणी मोहीम आखली जाते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Malaria Vaccine: मलेरियावरची लस पहिली भारतीय लस तयार,ICMR करणार खासगी कंपनी करार

Soyabean Pakoda Recipe : पावसाळ्यात एकदा 'सोयाबीन भजी' खाऊन तर पाहा, कांदा-बटाट भजी विसरून जाल

Politics: काँग्रेसचा बडा नेता भाजपवासी; पक्षप्रवेशावेळी मंत्रोच्चार, स्टेज दुमदुमला, पाहा VIDEO व्हायरल

राज ठाकरेंच्या भाषणानंतर अमराठींची प्रतिक्रिया समोर, नेमकं काय म्हणाले? पाहा,VIDEO

Horrific Accident : थरारक! भरधाव कारने २० हून अधिक जणांना चिरडलं, ५ जणांची प्रकृती चिंताजनक

SCROLL FOR NEXT