नंदुरबार: नाशिकमध्ये पोलीस स्टेशनमध्ये मद्यपानाचे प्रकरण गाजत असतांनाच नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा येथील शासकीय विश्रामगृहात काही शासकीय अधिकाऱ्यांनी थेट मद्याचा अड्डा मांडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नशेत टुल होवुन पडलेले हे मद्यपी अधिकारी मालेगाव महानगरपालिकेत कनिष्ठ अभियंता पदावर कार्यरत असल्याचे त्यांच्या ओळखपत्रावरुन दिसुन येत असुन त्यांच्या सोबत आणखीन दोन अन्य कर्मचारी अधिकारी देखील होते.
नवापुरचे माजी जिल्हा परिषद सदस्य विनोद नाईक कुटुंबासह देवमोगरा मातेचे दर्शन करुन परतत असतांना फ्रेश होण्यासाठी अक्कलकुवा विश्रामगृहावर गेले असता त्यांना हा सारा प्रकार दिसुन आला. याबाबत बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता यांच्याकडुन प्रतिक्रीया जाणुन घेण्याचा प्रयत्न केला. मात्र ते स्वतः बैठकीस असल्याने त्यांच्या प्रतिक्रिया मिळू शकलेली नाही. मात्र नवापूरचे माजी जिल्हा परिषद सदस्य विनोद नाईक यांनी मालेगाव महानगरपालिकेच्या महापौरांनी सदर कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.