ujjwal Nikam Saam Tv
महाराष्ट्र

'सोयरिक एकाशी, लग्न दुसऱ्याशी, मंगळसूत्र तिसऱ्याचं आणि गर्भ चौथ्याचा', उज्वल निकम यांचा टोला

महाविकास आघाडी सरकार आणि एकनाथ शिंदे गटात कुरघोड्या सुरुच आहेत.

अॅड. जयेश गावंडे

अकोला : शिवसेनेचे नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी ५० समर्थक आमदारांसोबत बंडाळी केल्याने महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी लावली आहे. महाविकास आघाडी सरकार (mva government) आणि एकनाथ शिंदे गटात सत्तासंघर्षावरून कुरघोड्या सुरुच आहेत. तमाम शिवसैनिक बंडखोर आमदारांविरोधात रस्त्यावर उतरुन आक्रमक झाल्याने शिवसेना आणि शिंदे गट संघर्ष पेटला आहे. त्यामुळे राज्यात घडत असलेल्या अभूतपूर्व घडामोडींवर विविध स्तरातून प्रतिक्रिया येत आहेत. जेष्ठ सरकारी वकील उज्वल निकम (Ujjwal Nikam) यांनी मिश्किल टीप्पणी केली आहे. 'सोयरिक एकाशी, लग्न दुसऱ्याशी, मंगळसूत्र तिसऱ्याचं आणि गर्भ चौथ्याचा', अशी सध्याच्या राजकारणाची परिस्थिती झाली असल्याचा टोला निकम यांनी लगावला आहे.

राज्याच्या राजकारणावर टीका करताना निकम यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, 'सोयरिक एकाशी, लग्न दुसऱ्याशी, मंगळसूत्र तिसऱ्याचं आणि गर्भ चौथ्याचा'अशी सध्याच्या राजकारणाची परिस्थिती झाली आहे. सध्याची राजकीय परिस्थिती अक्षरश:वीट आणणारी आहे. पक्षांतरबंदी कायदा आणखी सक्षम करण्याची गरज आहे. सध्याच्या परिस्थितीत उपाध्यक्ष काय निर्णय देतात, यावर राजकीय कोंडीचं भविष्य आहे.

Edited By - Naresh Shende

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: अकोला राडा प्रकरण : पोलिसांकडून ६ जणांना अटक

Shah Rukh Khan injured: शाहरुख खान चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान गंभीर जखमी; सिनेमाच्या सेटवर नेमकं काय घडलं?

Politics: हनी ट्रॅपमुळे शिंदेंचं सरकार आलं, बड्या नेत्यांचा समावेश; काँग्रेसच्या नेत्यानं उघडले पत्ते

WhatsApp New Feature: व्हॉट्सअ‍ॅपवर लाँच झाले Status Ads फीचर, कसं काम करणार?

Shravan : श्रावणात केस कापल्यावर काय होते? जाणून घ्या नेमके कारण

SCROLL FOR NEXT