सुशांत सावंत
मुंबई: अहमदनगरचे (Ahmednagar) जिल्ह्याचे नाव बदलून 'अहिल्यानगर' (Ahilyanagar) अशी मागणी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याकडे केली आहे. याबाबत आमदार गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरें यांना पत्र लिहिलं आहे. तसेच आपण स्वाभिमानी मुख्यमंत्री आहात हे सिद्ध कराल आणि होळकरशाहीचा सम्मान कराल ही अपेक्षा असं म्हणत नामांतर न केल्यास बहुजन जागा झालाय आणि संघटीत झालाय, हे ध्यानात ठेवा असा इशारा दिला आहे. (BJP MLA Gopichand Padalkar Demands CM Uddhav Thackeray To Change Name of Ahemadnagar District to Ahilyanagar)
(Ahmednagar News in Marathi)
हे देखील पाहा -
मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे आपणास अभिप्रित असेल की शेकडो हिंदूचे जीव गेलेल्या मुंबई बॅाम्बब्लास्टचा सुत्रधार दाऊद इब्राहीमच्या बहिणीसोबतचे आर्थिक भागीदार नवाब मलिक यांचे पालनकर्ते मा.शरदचंद्र पवार यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीमध्ये मुघलशाही पद्धतीने पोलीस बळाचा गैरवापर करत अहिल्यादेवी भक्तांना चौंडी येथे दर्शनापासून जाण्यास रोखलं. यांना हिंदू राजमाता यांची जयंती म्हणजे नातवाला लॅान्च करण्याचा इव्हेंट वाटतो.
जेव्हा हिंदूस्थान मुसलमानी राजवटीत हिंदूसंस्कृती, मंदिरं लुटली आणि तोडली जात होती, त्यावेळेस हिंदू राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी या हिंदुसंस्कृतीत प्राण फुकले, त्यांचा जीर्णोद्धार केला. म्हणून तमाम अहिल्याप्रेमींची लोकभावना आहे की हिंदू राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा जन्म झाला त्या जिल्ह्याचे 'अहमदनगर' नाव बदलून 'अहिल्यानगर' करण्यात यावे. तसेच नामांतराचा निर्णय तातडीने घेऊन आपण काकांच्या रिमोट कंट्रोलवर चालणारे नसून स्वाभिमानी मुख्यमंत्री आहात हे सिद्ध कराल आणि होळकरशाहीचा सम्मान कराल ही अपेक्षा, अन्यथा हा बहुजन जागा झालाय आणि संघटीत झालाय, हे ध्यानात ठेवा. असं आमदार गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्र्यांना लिहीलं आहे.
दरम्यान अहमदनगरच्या नामांतराच्या मागणीसोबतच औरंगाबादच्याही नामांतराची मागणी भाजपकडून केली जातेय. औरंगाबाद जिल्ह्याचं नाव बदलून संभाजीनगर करावं अशी मागणी भाजप आणि मनसेकडून केली जात आहे. विशेष म्हणजे औरंगाबादचं नाव संभाजीनगर करावं हीच भूमिका शिवसेनेचीही फार पुर्वीपासून आहे. मात्र आता महाविकास आघाडी सरकारमध्ये असल्याने उद्धव ठाकरेंना हा निर्णय एकाकी घेणं शक्य नाही. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या काही नेत्यांता नामांतराला विरोध आहे. शिवाय सत्तास्थापनेच्या वेळी किमान समान कार्यक्रमानुसार असा निर्णय घेण्यास अनेक अडचणी आहेत. मात्र आता औरंबादनंतर अहमदनगरच्याही नामांतराची मागणी जोर धरू लागली आहे.
Edited By - Akshay Baisane
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.