Dasara Melava 2024  Saam TV
महाराष्ट्र

Dasara Melava 2024 : शिंदे गटाचा दसरा मेळावा कुठे होणार? आझाद मैदान की शिवाजी पार्क

Ruchika Jadhav

ऑक्टोबर महिना सुरू होताच सर्वांना दसरा मेळाव्याचे वेध लागतात. शिवसेनेत फूट पडण्याआधी दादरच्या शिवाजी पार्कात भव्य दिव्य दसरा मेळावा पार पडत होता. अशात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बंड केल्यानंतर ठाकरे गट आणि शिंदे गट असे दोन गट पडले आहेत. त्यामुळे यंदा शिवाजी पार्कमध्ये कुणाचा दसरा मेळावा पार पडणार हे जाणून घेण्याची उत्सुकता सामान्यांच्या लागून आहे.

शिवसेनेचा दसरा मेळावा प्रत्येकवर्षी शिवाजी पार्कवर पार पडण्याची परंपरा आहे. त्यात गेल्यावर्षी येथे मेळावा घेण्यासाठी दोन्ही गटांमध्ये चांगलीच शा‍ब्दिक लढत पाहायला मिळाली होती. त्यावेळी शिवाजी पार्कमध्ये दसरा मेळाव्याची परवानगी ठाकरे गटाला मिळाली आणि शिंदे गटाचा दसरा मेळावा आझाद मैदानात पार पडला होता.

अशात यंदा देखील शिवाजी पार्कवरून दोन्ही गट पुन्हा एकदा आमणे सामणे येण्याची शक्यता होती. मात्र यावेळी शिवसेना शिंदे गटाचा दसरा मेळावा आझाद मैदान येथे पार पडणार अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. तर शिवसेना उद्भव ठाकरे गटाने दादर शिवाजीपार्क मैदान येथे अगोदरच मेळाव्यासाठी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे शिंदे गटाचा यंदाचा दसरा मेळावा सुद्धा आझाद मैदानातच होणार अशी चर्चा आहे.

राज्यात लवकरच विधानसभा निवडणुकांचं बिगुल वाजणार आहे. त्यामुळे सर्व पक्ष कामाला लागलेत. शिंदे गट आणि ठाकरे गट दोन्ही देखील आगामी निवडणुकांसाठी जास्तीत जास्त मतांनी विजयी होण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे आता यंदाच्या दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उद्धव ठाकरे देखील काय बोलतील याकडे नागरिकांचं लक्ष लागलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Live Updates : पुण्यात काचेच्या कारख्यान्यात माल उतरवताना दोघांचा मृत्यू

Safai Karamchari Bharti 2024 : परीक्षा न देता मिळणार सरकारी नोकरी; 23000 पदांसाठी मोठी भरती, वाचा सविस्तर

National Fruit: टरबूज हे कोणत्या देशाचे राष्ट्रीय फळ आहे?

Latur News : जागा वाटपावरून मविआमध्ये रस्सीखेच; लातूर जिल्ह्यातील तीन जागांवर ठाकरे गटाचा दावा

Beetroot Benefits: बीटरुट खा, निरोगी राहा; जाणून घ्या फायदे

SCROLL FOR NEXT