सातारा - पाचगणी मध्ये भाजप आणि राष्ट्रवादी (NCP) मधील संघर्ष टोकाला भाजपचे तालुकाध्यक्ष मधुकर बिरामणे यांच्या गाड्यांची तोडफोड आणि शेतीचे नुकसान केले. तर राष्ट्रवादीचे नेते राजेंद्र राजपुरे यांच्या कार्यकर्त्यांनी नुकसान केल्याचे आरोप केले आहे. पोलिसांनी (Police) मात्र या प्रकरणात दुर्लक्ष केल्याचे मधुकर बिरामणे यांनी आरोप केला आहे. याप्रकरणी वेळ पडली तर आम्ही रस्त्यावर उतरू असा इशारा भाजप (BJP) नूतन जिल्हाध्यक्ष आ.जयकुमार गोरे यांनी दिला आहे.
हे देखील पहा -
साताऱ्यातील पाचगणी येथील असणाऱ्या राजपुरी या गावात भाजप आणि राष्ट्रवादी यांच्यातील वाद उफाळून आला आहे. भाजपचे महाबळेश्वर तालुका अध्यक्ष मधुकर बिरामणे यांनी राजपुरी गावातील शाळेतील पिण्याच्या पाण्याच्या टाकीचे निकृष्ट पद्धतीने केलेले बांधकाम आणि त्यातील भ्रष्टाचार उघडकीस आणल्यामुळे या दरम्यानच्या काळात मागील आठवडाभरापासून भाजपचे तालुकाध्यक्ष मधुकर बीरामणे यांच्या वैयक्तिक मालकीच्या असणाऱ्या शेतातील पाईपलाईन जाळून टाकण्याचा प्रकार घडला.
तर राजेंद्र राजपूरे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी दोन चार चाकी गाड्यांच्या काचा फोडून मोठे नुकसान केले. याबाबत पाचगणी पोलिसांना वारंवार सांगूनही पोलीस दुर्लक्ष करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. याबाबत भाजपचे नूतन जिल्हाध्यक्ष जयकुमार गोरे यांची साताऱ्यातील लेकव्ह्यू हॉटेलमध्ये झालेल्या भाजपच्या मेळाव्यात भेट घेतली. यावेळी आमदार जयकुमार गोरे यांनी पोलीस प्रशासनाला या विषयावरून जाब विचारणार असल्याचे ते म्हणाले. तसेच वेळ पडली तर आम्ही रस्त्यावर उतरू असा इशारा यावेळी भाजप नूतन जिल्हाध्यक्ष आ.जयकुमार गोरे यांनी दिला आहे.
Edited By - Shivani Tichkule
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.