Mahayuti vs mva, Maharashtra Election Result : राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार येणार, हे सुरुवातीच्या कलावरुन स्पष्ट झालेय. मविआला प्रचारात चांगला प्रतिसाद मिळाला, पण मताधिक्यांमध्ये महायुतीला फायदा झाल्याचं दिसतेय. महायुतीनं २८८ पैकी २२० जागांवर आघाडी घेतली आहे. मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर महायुती आणि मविआमध्ये जोरदार टक्कर सुरु होती. पण त्यानंतर महायुतीने जोरदार मुसंडी मारत विजयाकडे आगेकूच केली आहे. सुरुवातीच्या कलानुसार, महायुतीमध्ये भाजपच मोठा भाऊ ठरलाय. भाजपने एकहाती १२६ जागांवर आघाडी घेतली आहे. हे सुरुवातीचे कल असले तरी भाजप आणि महायुतीमध्ये आनंदाचे वातावरण आहे. भाजपकडून मुख्यमंत्रीपदावर दावा केला जाण्याची शक्यता आहे.
महायुतीला २२० जागांवर आघाडी मिळाली आहे. त्यामध्ये भाजपच मोठा भाऊ ठरला असून त्यांनी १२७ जागांवर आघाडी घेतली आहे. तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे उमेदवार ५६ जागांवर आघाडीवर आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ३८ जागांवर आघाडी मिळाली आहे. सध्याच्या कलानुसार, राज्यात पुन्हा एकदा महायुतीचेच सरकार येणार हे स्पष्ट दिसत आहे. महायुतीमध्ये मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच होण्याची शक्यता आहे.
विधानसभा निवडणूक प्रचारावेळी महायुतीच्या तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी आमचाच मुख्यमंत्री होईल, असा दावा केला होता. त्यानंतर अमित शाह आणि नरेंद्र मोदी यांनी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील, असे संकेत दिले होते. आता सुरुवातीचे कल महायुतीच्या बाजूने आल्यानंतर भाजपच्या नेत्यांनी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील, असा दावा केला आहे. भाजपचे मंत्री प्रवीण दरेकर यांनी मुख्यमंत्रीपदावर मोठं वक्तव्य केले. भाजप सर्वात मोठा पक्ष होईल, देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री असतील, असे वक्तव्य प्रवीण दरेकर यांनी केलेय. भाजपकडे सर्वाधिक जागा आहेत. मुख्यमंत्रीपद भाजपकडेच जाईल असा दावा करत कार्यकर्त्यांनी जल्लोष करताना केला. भाजपचे दिग्गज नेते चंद्रकांत पाटील यांनीही मुख्यमंत्री भाजपचाच होईल, असा दावा केला होता. त्यामुळे महायुतीमध्ये मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच होण्याची शक्यता आहे.
विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराआधी महायुतीमध्ये मुख्यमंत्रीपदावरुन चर्चा सुरु होत्या. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत असे म्हटले होते. अमोल मिटकरी यांनी निकालाआधी २४ तास अजित पवार मुख्यमंत्री होतील, असा दावा केला होता. शिंदेंच्या शिवसेनेचे संजय शिरसाट यांनीही एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील, असे संकेत दिले होते. महायुतीमध्ये मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच होण्याची शक्यता आहे. भाजप केंद्रीय नेतृत्व कुणाला मुख्यमंत्री करणार? याबाबत चर्चा सुरु झाल्या आहेत. देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार की भाजप राजस्थान-हरियणासारखा धक्कातंत्र वापरणार, हे येणारा काळच ठरवेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.