Buldhana News Saam tv
महाराष्ट्र

दीड लाख रुपयाचा पकडला गुटखा; पोलिसांची धडक कारवाई

दीड लाख रुपयाचा पकडला गुटखा; पोलिसांची धडक कारवाई

संजय जाधव

बुलडाणा : गुटखा बंदी असताना देखील सर्रास गुटखा आयात व विक्री केली जात आहे. अशा प्रकारे चोरून गुटखा वाहतुक करत असलेले वाहन मलकापुर पोलिसांनी (Police) पकडले आहे. यात सुमारे दीड लाख रूपयांचा गुटखा आढळून आला आहे. (buldhana news Gutkha worth Rs one and half lakh seized Police action)

राज्यात गुटखा बंदी असताना जिल्ह्यात सर्रास गुटखा विक्रीसाठी आणल्या जात आहे. राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री जिल्ह्याचे (Buldhana News) असताना सुद्धा जिल्ह्यात करोडो रुपयाचा गुटखा आणला जात आहे. दर आठवड्यात जिल्ह्यात कुठेतरी गुटखा पकडल्या जात आहे. अन्न व औषध प्रशासन अधिकारी यांचे याकडे पूर्णतः दुर्लक्ष होताना दिसत आहे. तसेच मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे (Rajendra Shingne) यांचे सुद्धा गुटखा विरोधात कडक पाऊले उचलताना दिसत नसल्याने गुटखा माफीयांचे चांगलेच फावत आहे. म्हणून माफीयांची त्यांची हिम्मत होत असल्याची जिल्हाभर चर्चा आहे.

दोन आरोपी ताब्‍यात

मलकापूर येथे रात्रीच्या सुमारास मलकापूर पोलिसाना मिळालेल्या गुप्त माहितीवरून राष्ट्रीय महामार्गावर पोलिसांनी दोन वाहनाची कसून तपासानी केली असता लाखो रुपयाचा गुटखा आढळून आला. पोलिसांनी दीड लाख रुपयाचा गुटखा व वाहने जप्त केले असून दोन आरोपीना ताब्यात घेऊन गुटखा बंदी कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election Result : मुंबई कुणाची? ठाकरे, भाजप, शिंदे कुणाचा कोणत्या मतदारसंघात उमेदवार विजयी?

Broccoli Dishes: हिवाळ्यात सुपरफुड पेक्षा कमी नाही 'ब्रोकोली', आहारात समावेश करून पाहा

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: कर्जत-जामखेडमधून रोहित पवार विजयी

Ajaz Khan : सोशल मीडियावर हवा; मात्र राजकारणात डब्बागुल,'बिग बॉस' फेम अभिनेत्याचा दारूण पराभव

Tourist Spots: भारतातील सर्वाधिक भेट दिलेले 'ही' ५ पर्यटन स्थळ

SCROLL FOR NEXT