बीड - शहरालगत सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांनी जुगार अड्ड्यावर धाड टाकली असून या जुगार अड्डा प्रकरणी भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे. दरम्यान हे सर्व आरोप भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी फेटाळले असून ते म्हणाले, की माझा आणि या जुगार अड्ड्याचा काहीही संबंध नाही. ती जागा माझ्या मालकीची नाही. सदर जागा माझे भाऊ मदन मस्के यांची आहे. सत्ताधाऱ्यांकडून मला गोवलं जात आहे. पोलिसांनी कसलीही चौकशी न करता माझे नाव घेतले आहे. त्यामुळं मी न्यायालयात दाद मागणार आहे. असं म्हणत राजेंद्र मस्के यांची माध्यमांसमोर प्रतिक्रिया देत सर्व आरोप फेटाळले आहेत.
हे देखील पहा -
काय आहे प्रकरण?
बीड शहरालगत भाजपच्या जिल्हाध्यक्षांच्या जागेत सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर, सहाय्यक पोलीस (Police) अधीक्षकांसह टीमने रात्री छापा टाकला आहे. यावेळी ४८ जुगाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
तर त्यांच्याकडून रोख रक्कमेसह आलिशान कार (Car), मोबाईल असा जवळपास ७५ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात भाजपचे विद्यमान जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्यासह ५० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान ४८ जण पोलिसांच्या ताब्यात असून इतर तिघे फरार असून भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांचाही आरोपीत समावेश असल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे .
Edited By - Shivani Tichkule
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.