Mahavikas Aaghadi Melava Mumbai:  Saamtv
Maharashtra Assembly Elections

Sharad Pawar: 'मी म्हातारा झालेलो नाही'; 'सरकार बदलल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही', शरद पवारांनी थोपटले दंड

Maharashtra Election : लोकसभा निवडणुतीत मविआने महायुतीवर मात केली. त्यात शरद पवारांचा आणि त्यांच्या पक्षाचा मोठा वाटा होता. विधानसभा निवडणुकीतही शरद पवारांनी महायुतीला खिंडार पाडलंय. निवृत्तीच्या मुद्यावरुनही त्यांनी विरोधकांना टोला लगावलाय. पवारांनी नेमकं काय म्हटलंय? त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट.

Girish Nikam

महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक शरद पवार यांच्याभोवती फिरतेय, असं म्हटल्यास अतिशियोक्ती होणार नाही. कारण लोकसभेला मविआची सरशी झाली. त्यातही राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचा स्ट्राईक रेट सर्वात जास्त होता. 10 जागा लढवून 8 जागांवर विजय मिळाला. विधानसभेलाही पवारांच्या पक्षात जोरात इनकमिंग झालंय.

अजित पवारांकडून वारंवार आपल्या काकांच्या वयाचा उल्लेख केला जातो. त्यांना निवृत्तीची साद घातली जातेय. मात्र पवार वयाचा मुद्दा लिलया टोलवतात. आता तर त्यांनी महायुती सरकारला इशाराच दिलाय. मी अजून म्हातारा झालो नाही. सरकार बदलल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा इशारा त्यांनी धाराशिवमधील सभेतून दिलाय.

विधानसभा निवडणुकीत शरद पवारांनी महायुतीच्या नेत्यांना गळाला लावून सुरुंग लावलाय..मागील महिन्यात फलटणमधल्या सभेतही त्यांनी 84 च काय 90 वर्ष झालं तरी हे म्हातारं काही थांबणार नसल्याचं विधान केलं होतं. आपण महाराष्ट्राला योग्य रस्त्यावर आणल्याशिवाय स्वस्थ बसणार नसल्याचा निर्धार पवारांनी व्यक्त केला होता.

पाच दशकांपेक्षा जास्त राजकीय अनुभव असलेल्या पवारांना महाराष्ट्र तोंडपाठ आहे. यापूर्वीही अनेक धक्के पचवून ते निर्धारानं सत्तेत आले आहेत. स्वत: स्थापन केलेला पक्ष फुटल्यानंतरही ते खचले नाहीत. तरुणांना लाजवेल अशा उर्जेने ते प्रचाराला उतरलेत. त्यामुळे लोकसभेसारखाच विजय ते विधानसभा निवडणुकीतही मिळवणार का ?याकडे महाराष्ट्राचं लक्ष आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mahrashtra Election Result : हूश्श! अखेर रोहित पवार विजयी झाले

Maharashtra Election Results: अजित पवारांचे शिलेदार चमकले! पाहा दादांच्या राष्ट्रवादीच्या ४१ विजयी आमदारांची संपूर्ण यादी

PM Narendra Modi : 'एक है, तो सेफ है'; महाराष्ट्रातील विधानसभा निकालानंतर PM नरेंद्र मोदींनी पुन्हा दिला नारा

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: महायुतीच्या विजयाचं दिल्लीत सेलिब्रेशन

Amit Thackeray: 'हा कोणा राजपुत्राचा पराभव नसून..', निकालानंतर अमित ठाकरेंची प्रतिक्रिया, राज ठाकरेही म्हणाले, अविश्वसनीय...'

SCROLL FOR NEXT