नवी दिल्ली - व्हॉट्सअॅप कंपनीने Delete For Everyone या फीचर्समध्ये काही बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. 2017 साली Delete For Everyone हा पर्याय युजर्सला देण्यात आला होता. त्यानंतर आता कंपनीने यात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता युजर्सने चुकून पाठवलेल्या मेसेजला डिलीट करण्यासाठी आणखी वेळ मिळणार आहे.
हे देखील पहा -
याआधी मेसेज डिलीट करण्यासाठीची वेळ 7 मिनिटांचा होती त्यानंतर या फीचर्सची वेळ वाढवून एका तासांहून अधिक वेळेसाठी वाढवली होती. परंतु आता या फीचर्सची वेळमर्यादा ही कायमस्वरूपी काळासाठी असणार आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हा फीचर v2.21.23.1 अँड्रॉईड बीटा व्हर्जनमध्ये पाहण्यात आले होते. एका रिपोर्टनुसार व्हॉट्सअॅप या फीचर्सवर काम करत असल्याची माहिती मिळाली आहे. परंतु हे फीचर्स युजर्ससाठी कधीपर्यंत येणार याची माहिती अद्याप समोर आलेली नसून हे फीचर्स वापरण्यासाठी युजर्सला काही काळ वाट पाहावी लागणार आहे.
Edited By - Shivani Tichkule
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.