Electricity Bill Saam Tv
लाईफस्टाईल

Electricity Bill : कडाक्याच्या थंडीतही वीजेच्या वाढत्या बिलाने घाम फुटलाय? या टीप्स फॉलो करा, बिल येईल कमी

Electricity Bill Hacks : ऋतू कोणताही असो वीज बिल तर आपल्याला भरावे लागतेच. परंतु, हिवाळ्यात वातावरण थंड असल्यामुळे आपण फॅन किंवा एसी बंद ठेवतो. पण तरीदेखील वीजचे बिल हे अधिक प्रमाणात येत असेल तर काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी.

कोमल दामुद्रे

How To Reduce Electricity Bill In Winter :

ऋतू कोणताही असो वीज बिल तर आपल्याला भरावे लागतेच. परंतु, हिवाळ्यात वातावरण थंड असल्यामुळे आपण फॅन किंवा एसी बंद ठेवतो. पण तरीदेखील वीजचे बिल हे अधिक प्रमाणात येत असेल तर काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी.

सध्या घरात इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर अधिकच वाढला आहे. टीव्ही फ्रीजपेक्षाही अनेक उपकरणे तासनतास सुरु असतात. या सगळ्यांमुळे आपले काम तर होतेच पण त्याचा भार मात्र खिशावर पडतो. जर हिवाळ्यात ही विजेचे बिल अधिक प्रमाणात येत असेल तर या टीप्स फॉलो करा. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

1. फ्रीजचे तापमान

थंड फ्रीज देखील अधिक वीज घेतो. म्हणून बचत करण्यासाठी त्याचे तापमान वाढवा. असे केल्याने फ्रीजमध्ये ठेवलेले पदार्थ (Food) ताजे राहातात आणि बिलही कमी येतो.

2. उपकरणे बंद करण्यास विसरु नका

घरामध्ये (Home) अनेक इलेक्ट्रॉनिक उपकरणे वापरली जातात. अशा परिस्थितीत विजेची बचत करण्यासाठी स्वीच ऑन केल्यानंतर ते वेळेवर (Time) बंद करणे सर्वात महत्त्वाचे आहे. यासाठी घरात किंवा खोलीत कोणी नसेल तेव्हा स्वीच ऑफ करा. तसेच घरातून बाहेर पडताना सर्व स्विचेस बंद करायला विसरु नका.

3. ५ स्टारचे इलेक्ट्रॉनिक उपकरणे

इलेक्ट्रॉनिक अप्लाएंसेसवर जितके जास्त स्टार तितके जास्त विजेचा बिल कमी येण्याची गॅरंटी असते. यामध्ये तुम्ही कोणत्या प्रकारचे इलेक्ट्रिक अप्लाएंसेस खरेदी करता यावर सगळे अवलंबून असते.

4. स्टँडबाय मोड

एनर्जी फ्रीसाठी स्टँडबाय मोड चुकल्याने वीजेचे बिल अधिक प्रमाणात येऊ शकते. त्यासाठी कोणतेही इलेक्ट्रिक उपकरणांचा वापर केल्यास ते पूर्णपणे बंद केले आहेत की, नाही हे तपासा

5. एअर कंडिशनर वापरणे टाळा

हिवाळ्यात वातावरण थंड असले तरी, अनेकांना एसी वापरण्याची सवय असते. जर तुम्ही क्षमतेपेक्षा जास्त एसी वापरत असाल तर काही गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे. फक्त गरज असेल तरच एसी ऑन करा. एसीच्या अधिक वापरामुळे विजेचे बिल अधिक येते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: 'राष्ट्रवादीचं विलीनीकरण भाजपच्या अटींवर'; सुनील तटकरेंनी सांगितलं गुपित?

Nishikant Dubey: मोदी हे भाजपची मजबुरी; नरेंद्र मोदींशिवाय भाजप 150 जागाही जिंकणार नाही; खासदाराच्या विधानानं खळबळ

Maharashtra Live News Update: आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीसांची हॉटेलमध्ये भेट, अर्धा तास गुप्त चर्चा?

Maharashtra Politcis : हिंदीसक्तीवरुन भाजप-मनसेत जुंपली; राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना चॅलेंज, VIDEO

Hindi Marathi Language Controversy : 'दुबे मुंबई आओ, डुबो डुबो कर मारेंगे'; दुबे विरुद्ध राज ठाकरे वाद आणखी पेटणार? VIDEO

SCROLL FOR NEXT