Instagram Upcoming Feature Saam Tv
लाईफस्टाईल

Instagram Upcoming Feature: इन्स्टाग्रामचे नवीन फिचर! ७ दिवस पाहाता येणार स्टोरी, कसे? जाणून घ्या सविस्तर

Instagram: इन्स्टाग्राम लवकरच एक नवीन फिचर लाँच करणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Instagram Feature:

इन्स्टाग्राम हे सर्वात जास्त वापरले जाणारे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. सध्याच्या काळात सर्वात जास्त तरुण पिढी इन्स्टाग्रामचा वापर करते. इन्स्टाग्राम नेहमीच नवनवीन अपडेट लाँच करत असते. युजर्संना वापर करण्यासाठी सोपे जावे यासाठी नवीन फिचर येत असतात. लवकरच इन्स्टाग्रामचे नवीन फिचर लाँच होणार आहे.

इन्स्टाग्राम लवकरच स्टोरी फिचरसाठी एक अपडेट देणार आहे. या नवीन फिचरमध्ये युजर्स २४ तासांपेक्षा जास्त वेळापर्यंत त्यांची स्टोरी सेट करु शकतील. त्यामुळे इन्स्टाग्रामनर ही स्टोरी २४ तासांपेक्षा जास्त वेळ दिसणार आहे.

इन्स्टाग्रामच्या नवीन फिचरमध्ये युजर्स ७ दिवसांसाठी स्टोरी शेअर करु शकतील. याशिवाय जर युजर्सची इच्छा असेल तर मध्येच स्टोरी काढू शकता. त्यामुळे आता युजर्स त्यांच्या इच्छेनुसार स्टोरी शेअर करु शकतात तसेच डिलीटदेखील करु शकतात.

या नवीन फिचर्सचा फायदा युजर्संना होणार आहे. या फिचरच्या मदतीने युजर्संना लोकांपर्यंत माहिती देणे सोपे होणार आहे. तसेच स्टोरी जास्त काळ ठेवता येणार असल्याने लोकांच्या लक्षात राहील.

इन्स्टाग्राम सध्या या फिचरवर काम करत असून लवकरच हे फिचर स्मार्टफोनमध्ये उपलब्ध होईल. परंतु याबाबत इन्स्टाग्रामने कोणत्याही प्रकारची अधिकृत माहिती दिली नाहीये.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Indrayani : 'इंद्रायणी'समोर मोठं आव्हान; नवऱ्याचा अपमान करणाऱ्या पुंडलिकला कसं देणार उत्तर? पाहा VIDEO

kids Diet: लहान मुलांच्या विकासासाठी कोणता आहार योग्य? जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी

Night Thirst: रात्री झोपेतून उठून वारंवार पाणी पिताय? तुम्हाला आजार तर नाही ना? वाचा

BSNL 4G/5G सिम कार्ड ऑनलाइन अपग्रेडसाठी जाणून घ्या आवश्यक सोप्या आणि सुरक्षित स्टेप्स

Maharashtra Politics : राज्यातील या नेत्याचे मंत्रिपद जाणार, अमित शाह ७ जणांना डच्चू देणार, राऊतांच्या दाव्याने खळबळ!

SCROLL FOR NEXT