मुंबई : आपल्या काॅमेडीने प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणारी काॅमेडीयन (Bharti Singh) भारती सिंगचा काही दिवसांपूर्वीच वाढदिवस साजरा झाला. यानंतर भारतीच्या आरोग्याविषयी काही अफवा समोर आल्या होत्या. ज्यामुळे तिचे चाहते तिच्या आरोग्याविषयी चिंता व्यक्त करत होते. परंतु भारतीने या सर्व अफवांचा विरोध करणारा एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये तिने सर्व अफवांवर तीव्र प्रतिक्रिया देत आपला राग व्यक्त केला आहे.
काॅमेडीस्टार भारती सिंग ही सोशल मिडीयावर (Social Media) नेहमीच चर्चेत असते. मात्र नुकतेच तिच्या प्रकृतीबाबतच्या खोट्या अफवांमुळे ती इतकी संतप्त झाली की, तिने नुकताच एक व्हिडीओ शेअर करून आपला संताप व्यक्त केला आहे. सोशल मीडियावर भारती सिंगचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये तिची प्रकृती खूप खराब झाली आहे आणि तिला चालता-फिरता येत नसल्याचे दाखवले आहे. त्यामुळेच चाहत्यांनी तिच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त केली होती. मात्र भारती सिंगने याबाबत नाराजी व्यक्त करत हा व्हिडीओ खोटा असल्याचे स्पष्ट केले आहे. नुकताच भारती सिंगने तिच्या सोशल मीडिया हॅंडलवरून एक व्हिडीओ शेअर करत मी पूर्णपणे ठिक असल्याचे सांगितले आहे.
भारती सिंगने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये, 'हॅलो मित्रांनो, मी पूर्णपणे व्यवस्थित आहे. काही नेटकऱ्यांनी माझी तब्येत ठीक नसल्यामुळे मी हालचाल करू शकत नाही आशा अफवा पसरवल्या होत्या. परंतु, असे काही नाही आहे. ज्यांनी या अफवा पसरवल्या आहेत त्यांना मी सांगू इच्छिते की माझे चाहते या अफवांमुळे चिंतेत आहेत. तर तुम्ही अशा अफवा न पसरवता कोविड सारख्या गंभीर विषयांवर लक्ष द्या'.
'व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये माझा जुना व्हिडीओ आहे. या व्हिडीओमध्ये मी झोपाळ्यातून पडताना दिसते आहे. तो माझा एक मजेदार व्हिडीओ आहे. त्याचबरोबर माझा प्रेग्नेंसीचा फोटो दाखवला आहे, आणि मला चालता-फिरता येत नसल्याचे सांगितले आहे. हा एक खोटा व्हिडीओ आहे. हा व्हिडीओ अजिबात व्हायरल करू नका अशी माझी तुम्हाला विनंती आहे'. असं सांगणारा व्हिडीओ भारती सिंगने तिच्या सोशल मीडिया हॅंडलवर पोस्ट केला आहे. भारती सिंगने शेअर केलेला व्हिडीओ पाहिल्यानंतर तिच्या चाहत्यांनी देखील सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.