Jhanak Shukla Wedding SAAM TV
मनोरंजन बातम्या

Jhanak Shukla Wedding : 'कल हो ना हो' फेम अभिनेत्रीने बांधली लग्नगाठ, कोण आहे नवरा?

Jhanak Shukla Wedding Video : 'कल हो ना हो' फेम अभिनेत्री झनक शुक्ला लग्नबंधनात अडकली आहे. तिच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. झनकचा नवरा कोण, जाणून घेऊयात.

Shreya Maskar

शाहरुख खानचा (Shah Rukh Khan ) चित्रपट 'कल हो ना हो' (Kal Ho Naa Ho) फेम अभिनेत्री झनक शुक्ला नुकतीच लग्नबंधनात अडकली आहे. या चित्रपटात झनकने (Jhanak Shukla) बॉलिवूडचा किंग खान म्हणजे शाहरुख खानसोबत काम केले होते. झनकने बॉयफ्रेंड स्वप्नील सूर्यवंशीसोबत लग्नगाठ बांधली. वयाच्या २८ व्या वर्षी झनकने लग्न केले आहे.

झनक शुक्ला अनेक वर्षांपासून स्वप्नील सूर्यवंशीला डेट करत होती. २०२३मध्ये त्यांचा साखरपुडा पार पडला. झनक आणि स्वप्नीलने लग्नासाठी पारंपारिक लूक केला होता. झनकने लाल रंगाची साडी नेसली होती. तर स्वप्नीलने पांढऱ्या रंगाची शेरवानी परिधान केली होती. सध्या या जोडप्यावर कलाकार आणि चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

झनक शुक्ला आणि स्वप्नीलचा लग्नसोहळा नागपूरमध्ये पार पडला. झनक शुक्ला टिव्ही अभिनेत्री सुप्रिया शुक्लाची मुलगी आहे. सुप्रियाने देखील अनेक मोठ्या हिंदी मालिकांमध्ये काम केले आहे. 'कुमकुम भाग्य' ही त्यांची सर्वात गाजलेली मालिका होती. आईप्रमाणेच झनक शुक्लाही अभिनयाची खूप आवड आहे.

झनक शुक्लाचा नवरा कोण?

झनक शुक्ला ही उत्तम अभिनेत्री आहे. तिने 'कल हो ना हो' चित्रपटासोबतच 'करिष्मा का करिष्मा' या 90sच्या शोमध्ये रोबोटची भूमिका साकारली होती.लहान मुलीची भूमिका साकारली आहे. तर 'कल हो ना हो' चित्रपटात भूमिका जिया नावाच्या लहान मुलीच्या भूमिकेत दिसली. झनकने बालवयात अनेक मालिका, चित्रपट यांच्यात काम केले आहे. लहानपणी तिचा क्युट लूकने चाहत्यांना भुरळ घातली होती. झनक शुक्लाचा नवरा स्वप्नील सूर्यवंशी मेकॅनिकल इंजिनिअर आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Suknya Samruddhi Yojana : आता बँकेत जायची गरज नाही, घरबसल्या उघडा सुकन्या समृद्धी योजनेचं खातं

Weekly Horoscope: 'या' राशींच्या आर्थिक समस्या सुटणार आहेत; जाणून घ्या साप्ताहिक राशीभविष्य

Maharashtra Politics: उद्धव ठाकरे राज ठाकरेंकडे भिकेचा कटोरा घेऊन गेले रामदास कदमांची जहरी टीका |VIDEO

kalyan : कल्याणमध्ये गांजा तस्करी; खडकपाडा पोलिसांनी कारवाई करत तरुणाला घेतले ताब्यात

Anushka Sen: जेन झी मुलींनी अनुष्का सेनकडून घ्याव्यात 'या' स्टायलिंग टिप्स

SCROLL FOR NEXT