Ankita lokhande and vicky jain saam tv
मनोरंजन बातम्या

रिअॅलिटी शो मध्ये 'स्मार्ट जोडी'ने मारली बाजी, विजेत्या जोडीला लाखो रुपयांचं बक्षीस

प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचलेला सुपरहिट शो 'स्मार्ट जोडी'चा नुकताच समरोप झाला.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : दिवसेंदिवस ओटीटवर वेब सीरिज पाहण्याची क्रेझ वाढत असतानाच आता प्रेक्षकांची टेलिव्हिजनवरही रिअॅलिटी शो (Reality Show) पाहण्याची उत्सुकता वाढली आहे. सिने कलाकारांच्या जबरदस्त अभिनयामुळं प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचलेला सुपरहिट शो स्मार्ट जोडीचा (Smart Jodi Show) नुकताच समरोप झाला. स्टार प्लस वाहिनीवर सुरु असलेल्या 'स्मार्ट जोडी' या कार्यक्रमानं शेकडो प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. गेल्या काही दिवसांपासून विजेत्या जोडीला पाहण्याची प्रेक्षकांची उस्तुकता शिगेला पोहोचली होती. परंतु, आता या कार्यक्रमाची विजेती जोडी घोषित केल्यानं अनेक चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

'या' जोडीनं केली कमाल

टीव्हीवर अनेक कार्यक्रम होत असतात. पण रिअॅलिटी शो पाहणं प्रेक्षकांना खूपच आवडतं. कारण स्टार प्लस वाहिनीवर सुरु असलेल्या 'स्मार्ट जोडी'या शोसाठी प्रेक्षकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळाला आहे. स्मार्ट जोडी कार्यक्रमाची विजेती जोडी नुकतीच घोषीत करण्यात आलीय. प्रसिद्ध अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) आणि विक्की जैन (vicky jain) यांनी कार्यक्रमाच्या विजेतेपदाचा मान पटकावला. तसेच 'बलराज स्याल आणि दीप्ती तुली' ही जोडी रनरअप ठरली. तर 'अर्जुन बिजलानी आणि नेहा स्वामी' या जोडीने तिसरा क्रमांक पटकावला. विजेती जोडी अंकिता लोखंडे आणि विक्की जैन यांना आकर्षक चषक आणि २५ लाख रुपयांचं मानधन देण्यात आलं आहे.

अंकिता आणि विक्कीने केल्या भावना व्यक्त...

या कार्यक्रमाचे विजेते ठरल्यानंतर अंकिता लोखंडे खूपचं खूश आहे. चषक जिंकल्यानंतर ती म्हणाली,'स्मार्ट जोडीचा किताब जिंकून मला खूप आनंद झाला आहे'. आपल्या विजयाचं श्रेय तिचा नवरा विक्की याला देत अंकिता पुढे म्हणाली की, हा विजय तिचा नवरा विक्कीच्या मदतीशिवाय शक्य झाला नसता. ते नेहमी एकत्र असायचे आणि प्रत्येक टास्क एकमेकांवर पूर्ण विश्वास ठेवून करायचे. चषक जिंकण्याची गरज होती कारण आमच्या नात्यात बॉंडीग राहणं महत्वाचं आहे. त्यामुळे आमचे नाते आणखी घट्ट झाले आहे.हे चार महीने आमच्यासाठी सर्वात चांगले होते. आमचं संपूर्ण कुटुंब खूप आनंदी आहे. आम्ही सर्वजण खूप आनंदाने हा विजय साजरा करु.

अंकिता लोखंडे आणि विक्की जैन ही टीव्ही जगतातील नवखी जोडी आहे. दोघांचे लग्न १४ डिसेंबर २०२१ रोजी झाले.लग्नानंतर दोघांनी पहिल्यांदा एकत्र रिअॅलिटी शोमध्ये सहभाग घेतला. या कार्यक्रमामध्ये प्रत्येक जोडीने त्यांच्या केमिस्ट्री आणि अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली. विजेत्या जोडप्याला स्टेजवर एकत्र परफॉर्म करताना प्रेक्षकांनी पहिल्यांदाच पाहिलं. मात्र,आता या कार्यक्रमाला अंकिता आणि विक्की ही विजेती जोडी मिळाली आहे. विजेता झाल्यानंतर विक्की जैनने 'स्मार्ट जोड़ी' या कार्यक्रमातील त्यांच्या दोघांच्या प्रवासाबद्दल सांगितलं.

त्याने सांगितलं की, कार्यक्रमात येऊन तो खूप खुश होता कारण, कार्यक्रमामुळे तो त्याची सोलमेट अंकिता सोबत बराच वेळ घालवू शकला. त्याने कार्यक्रमाचे निर्माते आणि आपल्या चाहत्यांचे आभार मानत म्हटलं,'स्मार्ट जोडी' हा कार्यक्रम एका एडवेंचर जर्नी पेक्षा कमी नव्हता. या कार्यक्रमामुळे आमच्यात घट्ट नातं निर्माण झालं. आमच्या या सुंदर प्रवासासाठी या कार्यक्रमाचे धन्यवाद.आम्ही हा किताब जिंकण्यामागे आमच्या चाहत्यांनी आम्हाला भरभरून प्रेम आणि पाठींबा दिला म्हणून त्यांचेही खूप खूप आभार.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Tourism: तळेगावपासून काही अंतरावर वसलंय 'हे' सुंदर हिल स्टेशन; टेन्शनपासून दूर जाण्यासाठी परफेक्ट ठिकाण

Kolhapuri Food : हे आहेत कोल्हापूरमधील टॉप १० झणझणीत आणि खास डिशेस

Movie Tickets: पाकिस्तानमध्ये चित्रपटाच्या तिकिटाची किंमत किती आहे?

Maharashtra Politics : रमी खेळत नव्हतोच, राजकीय राड्यानंतर कृषीमंत्र्यांचं स्पष्टीकरण, व्हायरल व्हिडिओवर कोकाटे काय म्हणाले?

Bhiwandi : भिवंडीत बनावट अमूल बटरचे उत्पादन; कारखान्यावर धाड टाकत दोन जण ताब्यात

SCROLL FOR NEXT