Bribe Case Saam tv
क्राईम

Bribe Case : गुन्हा दाखल न करण्यासाठी ३० हजारांची लाच; राज्य उत्पादन शुल्कचे उपनिरीक्षकासह पंटर ताब्यात

Jalgaon News : कारवाईदरम्यान दोन्ही संशयितांनी दारू विक्री करण्यासाठी व तक्रारदारांना त्रास न देण्यासाठी प्रथम ५० हजारांची मागणी करून तडजोडीअंती ३० हजार रुपयांची मागणी करून लाचेची रक्कम स्वीकारण्याची तयारी दर्शविली

Rajesh Sonwane

भुसावळ (जळगाव) : गुन्हा दाखल न करण्यासाठी ३० हजारांची लाच स्वीकारणाऱ्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या उपनिरीक्षकासह त्याच्या पंटरला अटक करण्यात आली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने कारवाई केली. किरण सोनवणे असे अटकेतील पोलिस अधिकाऱ्याचे नाव आहे.

भुसावळ येथील राज्य उत्पादन शुल्क विभागातील उपनिरीक्षक किरण सोनवणे (वय ३९) यांनी पथकासह मंगळवारी (ता. १९) तक्रारदाराच्या घरी अवैध दारू विक्रीबाबत छापा टाकला होता. या छाप्यात तक्रारदाराकडे असलेल्या ३० ते ३५ हजार रुपयांच्या दारूच्या बाटल्या जप्त केल्या होत्या. या वेळी तक्रारदाराकडून १० हजार रुपये घेतले होते, तसेच या प्रकरणी गुन्हा दाखल न करण्यासाठी तक्रारदाराकडून ५० हजार रुपयांची लाच मागितली होती.

त्याबाबत तक्रारदाराने जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. या तक्रारीची पडताळणी केली असता, कारवाईदरम्यान दोन्ही संशयितांनी दारू विक्री करण्यासाठी व तक्रारदारांना त्रास न देण्यासाठी प्रथम ५० हजारांची मागणी करून तडजोडीअंती ३० हजार रुपयांची मागणी करून लाचेची रक्कम स्वीकारण्याची तयारी दर्शविली. शुक्रवारी संशयित किरण माधव सूर्यवंशी (वय ३७, रा. हुडको कॉलनी, भुसावळ) व खासगी इसमास ३० हजार रुपयांची रक्कम स्वीकारताना पकडले. त्यांच्यावर फैजपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: छगन भुजबळ तातडीने मुंबईला रवाना

Health: शरीरासाठी आवश्यक पदार्थ कोणकोणते? जाणून घ्या एका क्लिकवर

Abhijeet Kelkar: 'धुरळा उडाला, सूर्य पुन्हा एकदा तळपला...' देवेंद्र फडणवीस यांच्या विजयानंतर मराठी अभिनेत्याची जबरदस्त पोस्ट, म्हणाला...

Amravati Assembly Election 2024: बच्चू कडूंना पराभवाचा धक्का, अमरावतीच्या प्रत्येक मतदारसंघाचा निकाल एका क्लिकवर

Maharashtra Election Result: पुणेकरांची पसंती कोणाला? पुण्यातील २१ आमदार पाहा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT