Gold Price Today Saam Tv
बिझनेस

Gold Price Today: सोनं-चांदीला चकाकी! १० तोळ्याच्या दरात ५४०० रुपयांनी वाढ, २४ कॅरेटसाठी किती मोजावे लागणार?

Gold-Silver Rate Today: सोन्याच्या दरात गेल्या काही दिवसांपासून चढ-उतार सुरू आहे. सोन्याचे दर आज पुन्हा वाढले आहे. तर सोन्यापाठोपाठ चांदीचे दर देखील वाढले आहे.

Priya More

सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. सोनं-चांदीच्या दरात पुन्हा बदल झाले आहे. मंगळवारी सोन्याचे दर कमी झाले होते आज सोन्याचे दर वाढले आहे. तर आज चांदीचे दर देखील वाढले आहेत. १८ जून रोजी २४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरामध्ये ५४० रुपयांनी वाढ झाली आहे. म्हणजे १० तोळा सोनं खरेदी करण्यासाठीसाठी ५४०० रुपये अधिक मोजावे लागणार आहे. तर चांदीचे दर देखील चांगलेच वाढले आहे. आज सोनं-चांदी खरेदी करायला जाण्यापूर्वी जाणून घ्या दर किती आहेत...

गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात सतत चढ-उतार पाहायला मिळत आहे. सोन्याचे दर एक लाखांपार गेले आहेत. त्यामुळे लग्नसराईसाठी सोनं खरेदी करणाऱ्यांच्या खिशाला फटका बसत आहे. आज पुन्हा सोन्याच्या दरात वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. गुडरिटर्न्स या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, आज २४ कॅरेट सोन्याच्या दरात प्रति तोळा ५४० रुपयांनी वाढ झाली आहे.

२४ कॅरेटचे एक तोळा सोनं खरेदी करण्यासाठी तुम्हाला १,००,९१० रुपये खर्च करावे लागणार आहे. मंगळवारी २४ कॅरेटचे एक तोळा सोनं खरेदी करण्यासाठी १,००,३७० रुपये खर्च करावे लागत होते. तर हेच २४ कॅरेटचे १० तोळे सोनं खरेदी करण्यासाठी तुम्हाला १०,०९,१०० रुपये खर्च करावे लागणार आहे. म्हणजेच १० तोळ्या सोन्यामध्ये ५,४०० रुपयांनी वाढ झाली आहे.

आज २२ कॅरेट सोन्याच्या दरात देखील वाढ झाली आहे. २२ कॅरेट प्रति तोळा सोन्यामध्ये ५०० रुपयांनी वाढ झाली आहे. २२ कॅरेटचे एक तोळा सोनं खरेदी करण्यासाठी ९२,५०० रुपये मोजावे लागणार आहेत. तर २२ कॅरेटचे १० तोळे सोनं खरेदी करण्यासाठी तुम्हाला ९,२५,००० रुपये खर्च करावे लागणार आहे. तर २२ कॅरेटचे १० तोळे सोनं खरेदी करण्यासाठी तुम्हाला ९,२५,००० रुपये खर्च करावे लागणार म्हणजे यामध्ये ५००० रुपयांनी वाढ झाली आहे.

तर १८ कॅरेट सोन्याच्या दरात आज प्रति तोळा ४१० रुपयांनी वाढ झाली आहे. १८ कॅरेटचे एक तोळा सोनं खरेदी करण्यासाठी आज तुम्हाला ७५,६९० रुपये खर्च करावे लागणार आहेत. तर १८ कॅरेटचे १० तोळे सोनं खरेदी करण्यासाठी तुम्हाला ७,५६,९०० रुपये खर्च करावे लागणार आहेत. तर आज भारतात चांदीचे दर देखील वाढले आहे. गेल्या काही दिवसांपासून चांदीचे दर स्थिर होते. पण आज चांदीच्या दरात वाढ झाली आहे. चांदीच्या किमतीत प्रति ग्रॅम १ रुपयांनी वाढ झाली असून १ ग्रॅम चांगीसाठी १११ रुपये मोजावे लागणार आहे. तर १ किलो चांदीत १००० रुपयांनी वाढ झाली असून खरेदी करण्यासाठी १,११,००० रुपये द्यावे लागणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: 'राष्ट्रवादीचं विलीनीकरण भाजपच्या अटींवर'; सुनील तटकरेंनी सांगितलं गुपित?

Nishikant Dubey: मोदी हे भाजपची मजबुरी; नरेंद्र मोदींशिवाय भाजप 150 जागाही जिंकणार नाही; खासदाराच्या विधानानं खळबळ

Maharashtra Live News Update: आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीसांची हॉटेलमध्ये भेट, अर्धा तास गुप्त चर्चा?

Maharashtra Politcis : हिंदीसक्तीवरुन भाजप-मनसेत जुंपली; राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना चॅलेंज, VIDEO

Hindi Marathi Language Controversy : 'दुबे मुंबई आओ, डुबो डुबो कर मारेंगे'; दुबे विरुद्ध राज ठाकरे वाद आणखी पेटणार? VIDEO

SCROLL FOR NEXT