अकोला : अकोल्यातील मूर्तिजापूर तालुक्यात परतीच्या पावसाने मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. शेतात साचलेल्या पाण्यामुळे अनेक पिकांचे नुकसान दिसून येत असल्याने सोनोरी मुर्तिजापूर येथे तीन एकराच्या तुरीच्या शेतात गुरे सोडून दिली. (akola-news-heavy-rain-impact-and-farmer-Cattle-left-in-a-three-acre-turf-field)
मूर्तिजापूर तालुक्यातील सोनोरी व चिखली भागातील राहणार शेतकरी अजय राजपूत व संजय येरडावकर यांनी आपल्या तुरीच्या शेतात सर्व जनावरे सोडून त्यांचे कार्य व पिण्याच्या पाण्याची सोय करून दिली आहे. तालुक्यात यावर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्याने मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे सोंग्णीच्यावेळी परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
हरभरा पेरणीची तयारी
शासनाने अशा शेतकऱ्यांना आर्थिक मदत देणे गरजेचे आहे. अतिवृष्टीमुळे तूर या पिकाची वाढ खुंटली तर काही पिकांचे पिवळे झाले. असे नुकसान झाले असून आता तुरीवर ट्रॅक्टर फिरून हरभरा पेरणीची तयारी पुन्हा शेतकरी करत आहे. शासनाने अशा शेतकऱ्यांकडे लक्ष वेधून त्यांच्या तुरीची भरपाई करून द्यावी; अशी मागणी सुद्धा शेतकऱ्यांनी केलेली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.