शेतकऱ्याला वाढीव रक्कम देण्यास टाळाटाळ; सिडकोचे सामान जप्त करण्याचे कोर्टाचे आदेश

सिडको कार्यालयातील कॉम्प्युटर, टेबल, खुर्च्या शेतकऱ्याने जप्त केल्या.
Panvel News
Panvel Newsसिद्धेश म्हात्रे
Published On

सिद्धेश म्हात्रे

पनवेल - तालुक्यातील धुतूम गावातील प्रकल्पग्रस्थ बाळकृष्ण ठाकूर यांची जमीन 1991 साली सिडकोने संपादन केली. केवळ एक रुपया स्केअर मीटर दराने ही जमीन सिडकोने (Cidco) संपादन केली होती. मात्र या जमिनीच्या शेजारी असणारी जमीन सिडकोने तब्बल एक हजार ते दोन हजार स्क्वेअर मीटर दराने विक्री केली होती. त्यावेळी आपल्याला वाढीव रक्कम मिळावी म्हणून स्थानिक प्रकल्पग्रस्थ शेतकऱ्याने न्यायालयात दाद मागितली होती.

हे देखील पहा -

न्यायालयाने शेतकऱ्याच्या बाजूने निर्णय देत 800 रुपये स्क्वेअर मीटर प्रमाणे जमिनीचा मोबदला द्यावा असे आदेश दिले होते. मात्र न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यास सिडको मागील अनेक वर्षांपासून टाळाटाळ करत होती. अनेक बैठका होऊनही सिडको वाढीव रक्कम देण्यास टाळाटाळ करत असल्याने अखेर आज कोर्टाच्या आदेशानुसार सिडको ऑफिसच्या सामानाची जप्ती करण्यात आली.

Panvel News
Accident: मुरारका शाळेजवळ विचित्र अपघात; ट्रॅक्टर चालकाचा मृत्यू

सिडको कार्यालयातील कॉम्प्युटर, टेबल, खुर्च्या शेतकऱ्याने जप्त केल्या. जप्त केलेल्या सामनातून शेतकऱ्याची रक्कम पूर्ण होणार नसल्याने आता यापूढे कायद्यानुसार सिडकोचे अकाउंट बंद आणि सिडकोच्या मुख्य अधिकाऱ्याला अटक व्हावी म्हणून पुन्हा न्यायालयात जाणार आसल्याचे शेतकऱ्याच्या वकिलाने स्पष्ट केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com